VIDEO : Nashik | बोगस बियाण्यांमुळे कोबीऐवजी उगवली पाने, शेतकऱ्याने नांगर फिरवला

| Updated on: Oct 27, 2021 | 12:07 AM

बियाणे बोगस निघाल्यामुळे हवालदिल होऊन शेतकऱ्याने 2 एकर फुलकोबीच्या पिकावर नांगर फिरवला आहे. कोबीवर नांगर फिरवलेल्या शेतकऱ्याचे नाव दादाजी भामरे असे आहे. या शेतकऱ्याने एका कंपनीकडून बियाणे घेऊन 2 एकरांवर फुलकोबीची लागवड केली होती.

Follow us on

नाशिक : एकीकडे अतिवृष्टीमुळे अगोदरच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे काही बियाणे कंपन्यादेखील शेतकऱ्यांची फसवून करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना सटाणा तालुक्यातील अंबासन येथे घडली असून बियाणे बोगस निघाल्यामुळे हवालदिल होऊन शेतकऱ्याने 2 एकर फुलकोबीच्या पिकावर नांगर फिरवला आहे. कोबीवर नांगर फिरवलेल्या शेतकऱ्याचे नाव दादाजी भामरे असे आहे. या शेतकऱ्याने एका कंपनीकडून बियाणे घेऊन 2 एकरांवर फुलकोबीची लागवड केली होती. मात्र 2 महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर कोबीचे न येता फक्त पानेच उगवली. आपल्याला कंपनीने दिलेली बियाणे बोगस निघाले असल्याचे पाहून या शेतकऱ्याने कंपनीकडे तक्रार केली. अखेर हवालदिल होऊन या शेतकऱ्याने  2 एकर फुलकोबी पिकावर नांगर फिरवला.