Pune News : शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?

Pune News : शरद पवारांच्या समोरच शेतकऱ्याने घेतलं तोंड झोडून, नेमंक काय घडलं?

| Updated on: May 15, 2025 | 2:46 PM

Sharad Pawar Program : पुण्यातील रांजनगाव येथे एमआयडीसीच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या समोर भाषण करणाऱ्या एका शेतकऱ्याने आपलं तोंड जोडून घेतल्याचा प्रकार घडला आहे.

पुण्याच्या रांजनगाव येथे झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्याने शरद पवार यांच्यापुढे स्वत:चं तोंड झोडून घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील शरद पवारांनीच उभी केली. आता या औद्योगिक क्षेत्रात प्रदुषण करणारे उद्योग शरद पवारच बंद करतील, साहेब आम्हाला तोंड झोडायला लावु नका, असं म्हणत या शेतकऱ्याने शरद पवारांसमोरच तोंड झोडून घेतलं.

एमआयडिसीमधील गैरप्रकाराबाबत शासनाकडून कारवाई होतं नसल्याने हा शेतकरी संतप्त झाल्याचं बघायला मिळालं. गैरव्यवहाराबद्दल तक्रार नोंदवायला गेल्यास शेतकऱ्यांवर दबाव आणला जातो. त्यांना तक्रार करू दिली जात नाही. सरकार देखील अशा घटनांची दखल घेत नाही अशी खंत यावेळी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. शरद पवार यांनीच ही एमआयडीसी आणली आहे. तेच आम्हाला न्याय मिळवून देतील असं म्हणत या शेतकऱ्याने आपल्याच तोंडात मारून घ्यायला सुरुवात केल्याने गोंधळ उडाला.

Published on: May 15, 2025 02:46 PM