Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कारखाना विकला! वैद्यनाथ कारखान्याची विक्री झाली, दावा नेमका काय?

Pankaja Munde : पंकजा मुंडेंनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून कारखाना विकला! वैद्यनाथ कारखान्याची विक्री झाली, दावा नेमका काय?

| Updated on: Oct 13, 2025 | 8:57 PM

शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बेकायदेशीररित्या विकल्याचा आरोप केला आहे. शेतकऱ्यांसह सभासदांना अंधारात ठेवून हा व्यवहार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. थकीत पैसे दिवाळीपर्यंत न दिल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा करपे यांनी दिला आहे.

पंकजा मुंडे यांच्यावर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना नियमबाह्य पद्धतीने विकल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते कुलदीप करपे यांनी केला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेला हा कारखाना कायदेशीर प्रक्रिया न राबवता विकण्यात आल्याचा दावा करपे यांनी केला आहे. पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाने शेतकऱ्यांसह सभासदांना अंधारात ठेवून हा व्यवहार केल्याचे म्हटले जात आहे. करपे यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

शेतकरी नेते कुलदीप करपेंच्या मते, “ओंकार ग्रुप” च्या संचालकांसोबत संगनमत करून इतरांची देणी देण्याचा हट्ट टाळून कारखाना विकला गेला. दिवाळीपर्यंत शेतकरी, कामगार आणि बँकांचे थकीत पैसे न दिल्यास, तसेच ऊस गळपाची सोय न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा कुलदीप करपे यांनी दिला आहे.

Published on: Oct 13, 2025 08:57 PM