Kirit Somaiya | अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्टवर गुन्हा दाखल करावा : किरीट सोमय्या
दापोली पोलिस स्टेशनला अनिल परब यांच्या साई रिसॉर्टविरूध्द गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दाखल केल्याचे सोमैय्या यांनी सांगितले. (File a case against Anil Parab's illegal resort, Kirit Somaiya demand)
मुंबई : रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट संदर्भात गुन्हा दाखल करावा यासाठी भाजपचे नेते किरीट सोमैय्या आक्रमक झालेले पाहायला मिळाले. किरीट सोमय्या दापोली पोलिस स्थानकात दाखल झाले. दापोली पोलिस स्टेशनला अनिल परब यांच्या साई रिसॉर्टविरूध्द भारतीय दंड संहिता अन्वये 420 तसेच पर्यावरण संवर्धन अधिनियम कलम 15 महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53, 54, 55, 56 आणि 56 (अ) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 45 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दाखल केल्याचे सोमैय्या यांनी सांगितले.
