टायगर श्रॉफ, दिशा पाटणीविरोधात गुन्हा, लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरल्याने कारवाई

टायगर श्रॉफ, दिशा पाटणीविरोधात गुन्हा, लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरल्याने कारवाई

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 8:23 AM

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आणि अभिनेत्री दिशा पाटणी (Disha Patani) या दोघांविरुद्ध वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरून साथीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानसभा कलम 188, 34 IPC दिनांक 2.6.2021 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.