Ganesh Naik | नाटक केलं तर तमाशा दाखवेन! गणेश नाईकांचा नाव न घेता इशारा; नेमका निशाणा कुणावर?
नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. मंत्री गणेश नाईक यांनी आपल्या वक्तव्यातून विरोधकांना आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांना थेट इशारा दिला आहे. “कोणी नाटक केलं तर त्या नाटकाचा तमाशा लोकांना दाखवेन,” असा इशारा गणेश नाईक यांनी दिला आहे.

“आम्हाला बुद्दू समजाल तर लायकी दाखवू,” अशा आक्रमक शब्दांतही गणेश नाईक यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, या वक्तव्यामध्ये गणेश नाईक यांनी कोणाचेही थेट नाव घेतलेले नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याचा रोख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
गणेश नाईक यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे नवी मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.