Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी, ‘शिवतीर्थ’च्या बाप्पाकडे धावाधाव… ठाकरे, फडणवीसांनंतर शिंदेंही गणेशाचरणी लीन

Raj Thackeray : राज ठाकरेंसाठी, ‘शिवतीर्थ’च्या बाप्पाकडे धावाधाव… ठाकरे, फडणवीसांनंतर शिंदेंही गणेशाचरणी लीन

| Updated on: Aug 29, 2025 | 8:35 AM

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि ठाकरेंच्या नेतृत्वासह महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या घरी भेट दिली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा राज ठाकरेंच्या घरी दर्शनानंतर ठाकरेंच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय आणि राजकीय बात म्हणात उद्धव ठाकरेंच्या गोटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केलाय. खरं म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक पाहता राज ठाकरे यांच्यासाठीच त्यांच्या बाप्पाकडे धावा धाव दिसते आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले. उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्री फडणवीसही दर्शनासाठी आले. फडणवीसानंतर संजय राऊतही राज ठाकरेंच्या घरी आले आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आता दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात बाप्पाचं दर्शन घेतलाय.

एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी देखील गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले. तर संजय राऊत देखील देशपांडे यांच्या घरी आले म्हणजेच मनसेच्या प्रमुख नेत्यांच्या घरी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांसह महायुतीचे नेतेही हजेरी लावतायत. उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी आल्यानंतर युतीच्या चर्चेला आणखी बळ मिळालंय. पण एकत्र राहण्याची सुबुद्धी मिळत राहावी असा टोला फडणवीसांनी लावावला होता त्याला संजय राऊतांनीही प्रत्युत्तर दिलंय.

Published on: Aug 29, 2025 08:35 AM