Gautami Patil : गौतमी पाटील अपघातात नवा ट्विस्ट, ‘ससून’चा रिपोर्ट पोलिसांच्या हाती, चालकाबद्दल मोठी माहिती समोर
गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणात एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. चालकाने मद्यपान केले नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयाने पोलिसांना सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती उघड झाली आहे. यामुळे चालकावरील संशय दूर झाला आहे.
गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी कार चालकाने मद्यपान केले नसल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या प्राथमिक अहवालातून ही बाब समोर आली असून, कार चालकाचा वैद्यकीय अहवाल आता पोलिसांच्या हाती आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडल्यानंतर कार चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर आता या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात चालकाने दारूचे सेवन केले नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या अहवालामुळे गौतमी पाटीलच्या कार अपघात प्रकरणाला नवी दिशा मिळाली आहे. या अपडेटमुळे चालकावरील मद्यपान केल्याचा संशय दूर झाला असून, पोलीस आता पुढील तपास करणार आहेत. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालाची पोलीस पडताळणी करत आहेत.
Published on: Oct 05, 2025 12:12 PM
