Video : राऊतांना ईडी ऑफिसला जायला त्रास होतोय, म्हणून अधिकारी दारी आले-गिरीश महाजन

Video : राऊतांना ईडी ऑफिसला जायला त्रास होतोय, म्हणून अधिकारी दारी आले-गिरीश महाजन

| Edited By: | Updated on: Jul 31, 2022 | 2:47 PM

संजय राऊत (Sanjay Raut) यांना अनेक दिवसांपासून ईडीच्या नोटिसा येत होत्या मात्र वारंवार बोलून सुद्धा संजय राऊत त्याबाबत टाळाटाळ करत होते. त्यांना ईडीच्या कार्यालयात जायला त्रास होत होता. म्हणून ई डी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करत असल्याची खोचक टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. संजय राऊत बाळासाहेबांची शपथ घेऊन ट्विट करून सांगत आहे […]

संजय राऊत (Sanjay Raut) यांना अनेक दिवसांपासून ईडीच्या नोटिसा येत होत्या मात्र वारंवार बोलून सुद्धा संजय राऊत त्याबाबत टाळाटाळ करत होते. त्यांना ईडीच्या कार्यालयात जायला त्रास होत होता. म्हणून ई डी त्यांच्या घरी जाऊन चौकशी करत असल्याची खोचक टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. संजय राऊत बाळासाहेबांची शपथ घेऊन ट्विट करून सांगत आहे की मी किती स्वच्छ आहे मात्र चौकशीच्या वेळेस शपथा खाण्याची आवश्यकता नसून तुम्ही जर स्वच्छ असाल तर तुम्हाला कोणी काही करू शकत नाही, असा चिमटा ही गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काढला आहे.