Goa Nightclub Fire: गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, 52 कंपन्यांचे मालक; कोण आहेत लुथरा ब्रदर्स?

Goa Nightclub Fire: गोल्ड मेडलिस्ट इंजीनिअर ते नाईट क्लबचा फाऊंडर, 52 कंपन्यांचे मालक; कोण आहेत लुथरा ब्रदर्स?

| Updated on: Jan 13, 2026 | 3:47 PM

नाईट क्लबमधील आगीप्रकरणी जर लुथरा ब्रदर्सना शिक्षा झाली नाही तर लोकांचा कायद्यावरील विश्वास उडेल. या दोघांना आणि इतर संबंधित सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.

पर्यटकांची गर्दी आणि झगमगतं नाईटलाइफ ही गोव्याची वैशिष्ट्ये आहेत. डिसेंबरमध्ये असंख्य पर्यटक गोव्याला फिरायला जातात. अशा ऐन पर्यटनाच्या काळात 6 डिसेंबरच्या मध्यरात्री गोव्यात मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवलं होतं. गोव्यातील अर्पोरा इथल्या ‘बर्च बाय रोमियो लेन’ नाईट क्लबला अचानक भीषण आग लागली आणि या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले. याप्रकरणी गोवा पोलिसांनी क्लबच्या मॅनेजरसह चार जणांना अटक केलीये. या घटनेनंतर सर्वांत मोठा प्रश्न होता की हा क्लब कोणाचा आहे आणि त्याचे मालक कुठे आहेत? पोलिसांच्या तपासात आढळून आलं की क्लबचे मालक प्रसिद्ध लुथरा ब्रदर्स असून आगीची घटना घडताच ते ताबडतोब देश सोडून थायलंडला पळून गेले.

Published on: Jan 13, 2026 03:47 PM