Bhagat Singh Koshyari | शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण

| Updated on: Feb 28, 2022 | 7:37 PM

माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं आहे.

Follow us on

YouTube video player

जळगाव : मराठी भाषा गौरव दिनी राज्यपाल (Governor) भरतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. राज्यपालांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी लावून धरली जात आहे. अशावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र, माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नावर राज्यपाल कोश्यारी यांनी बगल देत त्यावर बोलणं टाळलं. ते आज जळगावमध्ये बोलत होते. राज्यपाल म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असं स्पष्टीकरण भगतसिंह कोश्यारी यांनी दिलं आहे. दरम्यान, माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. माफी मागण्याबाबत त्यांनी बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं.