मियां-बीवी राजी…फिर भी नहीं होगी शादी? प्रेम विवाहासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक!

मियां-बीवी राजी…फिर भी नहीं होगी शादी? प्रेम विवाहासाठी आता आई-वडिलांची परवानगी आवश्यक!

| Updated on: Feb 23, 2026 | 9:41 AM

गुजरात सरकार विवाह नोंदणी कायद्यात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता प्रेम विवाह किंवा पळून जाऊन लग्न करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक असणार आहे. अर्जाच्या 40 व्या दिवशी प्रमाणपत्र मिळेल, मात्र पालकांना WhatsApp द्वारे सूचित केले जाईल. मुलींचे फसवणुकीपासून संरक्षण हा या बदलामागील उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी स्पष्ट केले.

गुजरात सरकार विवाह नोंदणी कायद्यात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित सुधारणेनुसार, गुजरातमध्ये आता प्रेम विवाह किंवा पळून जाऊन लग्न करायचं असेल, तरी आई-वडिलांची परवानगी गरजेची असणार आहे. जर कुणी प्रेम विवाहासाठी अर्ज केल्यास, मुलगा आणि मुलीच्या आई-वडिलांना व्हॉट्सअॅपवर सूचित केले जाईल. त्यानंतर अर्जाच्या 40 व्या दिवशी जोडप्याला लग्नाचे प्रमाणपत्र मिळेल.

आधीच्या कायद्यानुसार, मुलगा 21 आणि मुलगी 18 वर्षांची असल्यास त्यांना सज्ञान मानून लग्नाचा निर्णय घेण्याचे अधिकार होते. मात्र, नव्या कायद्यानुसार, विवाह नोंदणीसाठी पालकांना कळवणे बंधनकारक असेल. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी या बदलाचे स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, सरकार प्रेम विवाहाच्या विरोधात नाही, परंतु मुलींची फसवणूक टाळण्यासाठी हा बदल केला जात आहे. त्यामुळे, ‘मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी’ या जुन्या म्हणीला आता गुजरातमध्ये पालकांच्या परवानगीची अट लागू होणार आहे.

Published on: Feb 23, 2026 09:41 AM