येत्या 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

| Updated on: Aug 16, 2022 | 3:18 PM

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झालेलं आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.

Follow us on

मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे प्रशासनदेखील सतर्क झालेलं आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. हाय-टाईड आणि उंच लाटांमुळे प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पुढील 24 तास पावसाची परिस्थिती अशीच राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. राज्यात सोमवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुणे आणि साताऱ्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. विदर्भ, मराठवाड्यात काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.