Heavy rainfall in Maharashtra: पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी, पावसामुळे 59 बंधारे पाण्याखाली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापुरात पावसाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील वर्षीची परिस्थिती पुन्हा ओढावते का असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेला पडला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या पाण्याची पातळी 36 फूट 10 इंच इतकी वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पासून सुरू आहे. […]
कोल्हापुरात पावसाचा कहर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील वर्षीची परिस्थिती पुन्हा ओढावते का असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेला पडला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीच्या पाण्याची पातळी 36 फूट 10 इंच इतकी वाढली आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पासून सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळीत काळ सकाळपासूनच वाढ सुरू झाली आहे. 59 बंधारे पाण्याखाली गेले असून, पावसाने शहरासह जिल्ह्यातही जनजीवनावर परिणाम झाला. जिल्ह्यात 15 जुलैपर्यंत अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Published on: Jul 14, 2022 3:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
