VIDEO : Mumbai Rain | मुंबईत जोरदार पाऊस; मालाड, कांदिवलीत गुडघाभर पाणी

| Updated on: Aug 31, 2021 | 1:24 PM

गेल्या महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Follow us on

गेल्या महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसाने मुंबईसह ठाण्यात जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच हवामान खात्याने मुंबईसह ठाण्यात देखील ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला असून पुढील सलग तीन दिवस मुसळधार आणि अतिमूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसामुळे कांदिवली परिसरामध्ये गुडघाभर पाणी साचले आहे.