आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत धक्कादायक खुलासा
देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या शिवराज मोटेगावकरचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसतंय. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणात तो एकटाच नाही, तर अनेक हायप्रोफाईल पालक रडारवर आहेत.

मोटेगावकर हा पुण्यातील ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चा संचालक असून सीबीआयने त्याला या प्रकरणात अटक केली होती. मोटेगावकरने आपल्या मुलासाठी NEET पेपर विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्याच्या एका स्पेशल बॅचचा तपास केला जाणार आहे. या स्पेशल बॅचमध्ये काही निवडकच मुलं होती, असंही सूत्रांकडून समोर आलं आहे. या तपासात फक्त बॅचमधील मुलांचीच नाही, तर त्यांच्या पालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचं समोर आलं आहे.
Published on: May 26, 2026 2:24 PM
Follow Us