Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..

Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..

| Updated on: Aug 20, 2026 | 11:14 AM

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याबाबत विचार सुरू आहे. ही योजना ‘कमावा आणि शिका’ या संकल्पनेवर आधारित असेल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पैशांच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅग देण्यासही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

मनेसे नेते अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य केले. यावेळी त्यांनी एका शासकीय योजनेबबात मोठं विधान केलं. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार रुपये पॉकेटमनी देण्याच्या योजनेवर सध्या विचार सुरू आहे. ही योजना कमावा आणि शिका या धर्तीवर आधारित असेल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संभाव्य योजनेवर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, पॉकेटमनी देण्याची जबाबदारी पालकांची असते. जर सरकार असे पैसे देणार असेल, तर ते विद्यार्थी पैशांचा गैरवापर दारू किंवा सिगारेटसाठी केल्यास सरकार जबाबदारी घेणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्याऐवजी महाविद्यालयांची स्थिती सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी सुचवले. या पॉकेटमनी योजनेच्या चर्चेबरोबरच, राज्यात आणखी एका शिक्षण विषयक निर्णयाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूलबॅग दिल्या जातील. या योजनेवर 174 कोटी 19 लाख 35 हजार 424 रुपये खर्च अपेक्षित असून, 41 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on: Aug 20, 2026 11:14 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us