Hiroshima Nuclear Attack : आकाशातून आला काळ; काही कळायच्या आतच संपूर्ण शहर बेचिराख

Hiroshima Nuclear Attack : आकाशातून आला काळ; काही कळायच्या आतच संपूर्ण शहर बेचिराख

| Updated on: Aug 26, 2025 | 10:19 AM

अमेरिकेनं जपानमधील दोन शहरांवर केलेला अणुबॉम्ब हल्ला हा इतिहासातील काळा दिवस मानला जातो. अवघ्या काही सेकंदात शहरच्या शहर बेचिराख झालं होतं. त्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं आणि हा हल्ला कसा करण्यात आला, त्याविषयी सविस्तर जाणून घ्या..

6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकत संपूर्ण शहर बेचिराख केलं होतं. मानवी इतिहासातील हा काळाकुट्ट दिवस मानला जातो. त्याच्या तीन दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी नागासाकी शहरावरही अणुबॉम्ब हल्ला करण्यात आला होता. या दोन्ही हल्ल्यांनी संपूर्ण जग हादरलं होतं. त्यावेळी युद्ध सुरू असल्याने शहर आधीच भीतीच्या छायेखाली होतं. त्याचवेळी 6 ऑगस्ट रोजी सकाळी आकाशात एक विमान घिरट्या घालताना लोकांना दिसलं. परंतु काही कळायच्या आतच त्यातून एक मोठी वस्तू पडली आणि स्फोट झाला. या स्फोटाने अवघ्या काही सेकंदात हिरोशिमा उद्ध्वस्त झालं होतं. या अणुबॉम्ब हल्ल्याविषयी सविस्तर माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

Published on: Aug 26, 2025 10:19 AM