Mumbai Crime | मित्रांच्या मदतीने पतीची हत्या, पत्नीने घरातच पुरला मृतदेह

Mumbai Crime | मित्रांच्या मदतीने पतीची हत्या, पत्नीने घरातच पुरला मृतदेह

| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 8:23 PM

एका महिलेने आपल्या पतीचीच हत्या केली. त्याचा मृतदेह घरातच गाढला. त्यानंतर ती काहीच घडलं नाही, आपल्याला माहिती नाही, अशा आवेशात पोलीस ठाण्यात जावून पती मिसिंग असल्याची तक्रार देवून आली.

मुंबई : मुंबई जितकी स्वच्छ, भल्यामोठ्या उंच इमारतींची, सुंदर समुद्र किनाऱ्याची दिसते तितकंच तिच्या पोटात भरपूर काहितरी घडत असतं. बऱ्याच गोष्टी अर्थातच चांगल्या घडतात. पण काही गोष्टी प्रचंड भयानक, विश्वासाच्या पलिकडे आणि अनपेक्षित अशा असतात. आम्ही मायानगरी मुंबईत घडणाऱ्या क्राईम विषयी बोलतोय. मुंबईत नुकतीच एक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीचीच हत्या केली. त्याचा मृतदेह घरातच गाढला. त्यानंतर ती काहीच घडलं नाही, आपल्याला माहिती नाही, अशा आवेशात पोलीस ठाण्यात जावून पती मिसिंग असल्याची तक्रार देवून आली. पण पोलिसांनी तपासाअंती तिचं बिंग अखेर फोडलंच.