Nana Patole | नागपुरात काँग्रेसच्या छोटू भोयर यांची माघार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

| Updated on: Nov 26, 2021 | 4:36 PM

राष्ट्रवादीत काहीच नाराजी नाही. छोटू भोयर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश देतील. त्यानंतर ते काम करतील. राष्ट्रवादी दुखावेल असं कोणतंही वक्तव्य आम्ही केलं नाही. महाविकास आघाडीत फूट पडेल असं काही केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow us on

यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. नंदूरबारची जागा भाजपला गेली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला आली आहे. तसेच मुंबईतील दोन जागांपैकी एक जागा शिवसेना आणि दुसरी भाजपला मिळाली आहे. मात्र, नागपूरमध्ये लढत होणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे. त्यात काँग्रेसचा विजय होणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं. आज अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपली. कुणी अर्ज मागे घेतले आणि कुणी नाही घेतले हे स्पष्ट होणार आहे. आमचे उमेदवार छोटू भोयर विजयी होतील हा आमचा विश्वास आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.