अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

| Updated on: Jun 08, 2026 | 1:23 PM

नवी दिल्ली येथे आज INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. यामध्ये कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यवार आता सुप्रिया सुळेंनीच प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली येथे आज INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत असून देशातील महागाई, बेरोजगारी आणि NEET पेपर घोटाळ्यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. कालच गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने सामान्य नागरिक त्रस्त असल्याचे त्या म्हणाल्या. इतकेच नाही तर पुन्हा इंडीया आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना त्या म्हणाल्या उद्धव ठाकरे हे झूमद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. NEET पेपर प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची मागणी आपण यापूर्वीच केली होती, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष फुटले नसून फोडले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्र मॉडेल आता इतर राज्यांतही वापरले जात असल्याचे त्या म्हणाल्या. तृणमूल काँग्रेसबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

छगन भुजबळ यांच्या राज्यसभा चर्चेबाबत बोलताना, त्यांनी शून्यातून विश्व उभे केले असून दिल्लीत जाण्यात गैर काही नसल्याचे सुळे म्हणाल्या. किशोर मासाळ क्लिप प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि गलिच्छ असल्याची तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Published on: Jun 08, 2026 1:23 PM
Follow Us