दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही…खरगेंनी सांगितलं बैठकीत काय घडलं?
आज राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे. ती म्हणजे इंडिया आघाडीची बैठक. महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक आता पार पडली असून इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेऊन यांची सविस्तर माहिती दिली.
आज राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड चर्चेचा विषय ठरली आहे. ती म्हणजे इंडिया आघाडीची बैठक. महत्त्वाची बाब म्हणजे ही बैठक आता पार पडली असून इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेऊन यांची सविस्तर माहिती दिली.
या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की या बैठकीत २५ पक्षांचा समावेश होता. त्यांनी या बैठकीत आवर्जून उद्धव ठाकरेंचे नाव घेतले. ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी झूम मीटिंगद्वारे हजेरी लावली. बैठकीतील चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, ‘आम्ही पेपरफुटी प्रकरणी सविस्तर बातचीत केली.’ यानंतर महागाई आणि इतर देशव्यापी संकटांवर चर्चा केली. ‘आम्ही सर्व पक्ष एकजुटीने राहू आणि लढू,’ असेही त्यांनी नमूद केले.
पुढे खर्गे म्हणाले, आम्ही आता दर दोन महिन्यांनी मीटिंग घेणार आणि सर्व मित्र पक्षांना सहभागी करून घेणार. यानंतरची आमची बैठक हैदराबादला होणार आहे,