India Pakistan Ceasefire : मोठी बातमी… पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन्…

India Pakistan Ceasefire : मोठी बातमी… पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन्…

| Updated on: May 10, 2025 | 6:14 PM

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे, आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवल्याची माहिती समोर आली आहे. बघा काय म्हणाले परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री?

भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओंना फोन केला. दोन्ही बाजूंनी संध्याकाळी ५ वाजल्यापासून जमीन, हवा आणि समुद्रात सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली. पाक डीजीएमओ यांनी चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर चर्चा झाली आणि एकमत झाले. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर वाटाघाटी करण्याचा निर्णय झाला नसल्याची माहिती मिळतेय.

Published on: May 10, 2025 06:13 PM