US Cotton Tariffs : ट्रम्पच्या 50 % टेरिफचा फटका भारतातल्या कापसाला.. विरोधकांनी सरकारला घेरलं, केंद्राचा निर्णय काय?

US Cotton Tariffs : ट्रम्पच्या 50 % टेरिफचा फटका भारतातल्या कापसाला.. विरोधकांनी सरकारला घेरलं, केंद्राचा निर्णय काय?

| Updated on: Aug 29, 2025 | 10:59 AM

ट्रम्प यांच्या 50% टॅरिफचा फटका कापसाला बसणार आहे. अशातच 31 डिसेंबर पर्यंत केंद्र सरकारने कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं आहे. यावरून आता विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

अमेरिकेने भारताच्या कापडावर 50% शुल्क लागू केल्याने निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार आहे. तर केंद्र सरकारने कापूस आयातीवरील 11% शुल्क काढून टाकल्याने विक्रमी आयात होऊन देशामध्ये कापसाचा साठा वाढणार आहे.

केंद्र सरकारचा निर्णय काय?

30 सप्टेंबर पर्यंत कापसावरील 11% आयात शुल्क माफ केलं. वस्त्रोद्योगाला स्वस्त कच्चा माल उपलब्ध करून देणे आणि निर्यात क्षेत्राला चालना देणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा निर्णय घेताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शेतकरी आणि कापूस निर्यातदारांनाही आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. कापसावरील आयात शुल्क शून्य टक्के करण्याच्या निर्णयाला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. भारतामध्ये कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे 120 लाख हेक्टर इतकं आहे. भारतामध्ये जगातील एकूण कापूस क्षेत्राच्या 36% इतका कापूस पिकतो. क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापूस पिकतो. आयात शुल्क शून्य केल्यावर देशांतर्गत कापसाचे भाव 1100 रुपयांनी कोसळलेत. सरकारचा हा निर्णय आत्मघातकी असल्याची टीका करण्यात येत आहे.

Published on: Aug 29, 2025 08:52 AM