Indurikar Maharaj :  हे विकले गेलेले लोकं… 30 मिनिटांच्या सभेला 3 कोटी खर्च… इंदुरीकरांचं लेकीच्या लग्नाच्या चॅलेंजनंतर मिडीयाला ओपन चॅलेंज

Indurikar Maharaj : हे विकले गेलेले लोकं… 30 मिनिटांच्या सभेला 3 कोटी खर्च… इंदुरीकरांचं लेकीच्या लग्नाच्या चॅलेंजनंतर मिडीयाला ओपन चॅलेंज

| Updated on: Nov 17, 2025 | 3:56 PM

तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या मुलीचे लग्न हेलिकॉप्टरमधून नवरानवरी आणून थाटामाटात करावे. पण जर भविष्यात त्यांनी कीर्तनामध्ये "साधेपणानं लग्न केलं तरी मुलं होतात" असे शब्द वापरले किंवा "गुड्डी लग्नात ताल धरते" असे काही बोलले, तर तरुण वर्ग आणि तरुण मुली निश्चितपणे त्यांना जाब विचारू शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

इंदुरीकर महाराजांच्या भूमिकेवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांनी कीर्तनांमध्ये मुलींच्या लग्नाबद्दल आणि साधेपणाबद्दल केलेल्या उपदेशांवरून तळेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “इतरांच्या मुलींच्या लग्नांवर बोलाल तर मुली तुम्हाला जाब विचारणारच.”

या टीकेला प्रत्युत्तर देताना इंदुरीकर महाराजांनी राजकीय नेत्यांच्या सभांचा दाखला दिला. ते म्हणाले, “राजकीय नेत्यांच्या सभांवर कुणीही बोलत नाही, मात्र कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केल्यावर लोकांना पोटदुखी कशाला?” एका 30 मिनिटांच्या सभेला 3 कोटी रुपये खर्च होतात, पण त्या पैशांच्या स्रोताबद्दल कोणीही प्रश्न विचारत नाही, असे त्यांनी निदर्शनास आणले. “मला माहित होतं या अवलादी माझ्या मुळावर उठणार आहेत,” असे म्हणत त्यांनी आपल्या टीकेला महत्त्व न देण्याचे संकेत दिले. गेल्या 31 वर्षांपासून त्रास सहन करत असल्याचे सांगत, टीका करणारे “विकली गेलेली लोकं” आणि “भंकस माणसं” असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. आगामी काळातही ते आपल्या मुलीच्या लग्नावर मोठा खर्च करणार असून, यावरून आणखी “तमाशा” होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Published on: Nov 17, 2025 03:56 PM