
येवल्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, पिकावर अळीचा प्रादुर्भाव
येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. कारण सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
येवला, 4 ऑगस्ट 2023 | येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. कारण सोयाबीन पिकावर अळी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लगवली या पावसावर येवला तालुक्यातील शेतकर्यांनी सोयाबीनचे पिक घेतले. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने आता आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागड्या औषधांची फवारणी करून देखील हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. सोयाबीनवर एकरी 30 ते 35 हजार रुपये केलेला उत्पादन खर्च वाया जातो की काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्याला पडला असल्याने आता शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे.
Published on: Aug 04, 2023 12:39 PM
Related Video
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
देहूत संत तुकाराम महाराज यांच्यापालखी सोDehu : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रथाचं काम जोरातहळ्यासाठी पालखी रथ तयार करण्याचे काम सुरू
Buldhana : खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली
अंधेरीतील नामांकित हॉटेल्सवर BMC ची कारवाई, अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त
सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना पाइप लाइन फुटली