Kalyan : तुम्हाला परत भेटतो… कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपीचा माज उतरेना, पत्रकारांना उघड धमकी अन्…

Kalyan : तुम्हाला परत भेटतो… कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपीचा माज उतरेना, पत्रकारांना उघड धमकी अन्…

| Updated on: Jul 25, 2025 | 1:31 PM

गोपाल झा नावाच्या व्यक्तीला डॉक्टरांना भेटायचं होतं पण डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये एमआर होते. त्यामुळे तरुणीने गोपाल झा याला काही वेळ थांबण्यास सांगितलं त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोपाल झा यांची वाद झाला आणि मारहाणीचा प्रकार घडला.

कल्याण येथील खासगी रूग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. नुकतीच त्याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या आरोपीची मस्ती काही उतरताना दिसत नाहीये. आरोपी गोकुळ झा याने पत्रकारांनाच धमकी दिल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर त्याने पोलिसांना सुद्धा आरेरावी केल्याचे समोर आले आहे.

‘चुकीच्या बातम्या छापता तुम्ही… खरं सांगणं तुमचं काम आहे पण चुकीचं केलं तुम्ही… ज्याचा दोष नाही त्याला पण फसवलं.’, असं आरोपी गोकुळ जा पत्रकारांना म्हणाला. यापुढे तो पत्रकारांना धमकावत भेटू आपण परत…मुलाखत परत होईल.. तुम्हाला परत भेटतो… असं म्हणत आरोपी गोकुळ झाने पोलिसांसमोरच पत्रकारांना धमकी दिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रुग्णालयामधल्या मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी गोकुळ झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र आज आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा या दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Published on: Jul 25, 2025 01:31 PM