Kalyan : मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, ‘इतके’ दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Kalyan : मराठी रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण प्रकरणी मोठी अपडेट, ‘इतके’ दिवस आरोपी पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 25, 2025 | 4:02 PM

कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये एका खाजगी रुग्णालयामधल्या रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण झाली. एका परप्रांतीय तरुणाने हॉस्पिटलमधल्या मराठी तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणात मारहाण करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता यात मोठी अपडेट आलीये.

कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामधल्या रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण प्रकरणी एक मोठी बातमी समोर येत आहे. रुग्णालयामधल्या मराठी रिसेप्शनिस्टला बेदम मारहाण करणाऱ्या कथित आरोपी परप्रांतिय तरूण गोकुळ झा याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गोकुळ झाला काहीवेळापूर्वीच कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याने चांगलाच गोंधळ घातला होता. तर विनाकारण या प्रकरणात गुंतवलं जात असल्याचे मारहाण करणाऱ्या गोकुळ झाचं म्हणणं होतं. मात्र कोर्टानं त्याला चांगलंच फटकारलं आणि जी सुनावणी झाली त्यात त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गोपाल झा नावाच्या व्यक्तीला डॉक्टरांना भेटायचं होतं पण डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये काही एमआर बसेले होते. त्यामुळे तरुणीने गोपाल झा याला काही वेळ थांबण्यास सांगितलं त्यामुळे रिसेप्शनिस्ट तरुणी आणि गोपाल झा यांची वादावादी झाली. त्यानंतर गोपाल झा यांनी बाहेरून धावत येत तरुणीला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

Published on: Jul 23, 2025 12:56 PM