कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात, रोहित पवारांचा हटके प्रचार

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात, रोहित पवारांचा हटके प्रचार

| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 10:52 AM

कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. रोहित पवार हे  प्रचार सभा न घेता थेट बाजारात जाऊन व्यावसायिकांच्या गाठी भेटी घेत आहेत.

अहमदनगर :  कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. रोहित पवार हे  प्रचार सभा न घेता थेट बाजारात जाऊन व्यावसायिकांच्या गाठी भेटी घेत आहेत. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान ते कुंभार गल्लीत आले असताना त्यांनी मातीचे मडके बनवण्याचा देखील आनंद घेतला. तसेच प्रचारादरम्यान त्यांनी पाणीपुरी खाण्याचा देखील अस्वाद घेतला. त्यांच्या या हटके प्रचाराची सर्वत्र चर्चा होत आहे.