शिवसेना, संजय राऊत यांना मौन धारण करावं लागणार
कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोट्याळ्यात ठाकरे सरकारचा हात असल्याची टीका सोमय्यांनी केली
Image Credit source: TV9

शिवसेना, संजय राऊत यांना मौन धारण करावं लागणार

| Edited By: | Updated on: Mar 29, 2022 | 10:14 PM

महाराष्ट्रात जे कोविड केंद्रातून घोटाळे झाले आहेत, त्यामध्ये ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

महाराष्ट्रात जे कोविड केंद्रातून घोटाळे झाले आहेत, त्यामध्ये ठाकरे सरकार आणि संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. कोविड सेंटरमध्ये घोटाळे करणारी आणि महाराष्ट्र सरकारने ज्या कंपनीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकले होते,त्या कंपनीचा मालक आणि संजय राऊत यांची भीगीदार असल्याची टीकाही त्यांनी केली. किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह टीका करताना त्यांनी महाराष्ट्र पोलिसांवरही जोरदार टीका केली. महाराष्ट्र पोलीस उद्धव ठाकरे चालवतात टोलाही सोमय्या यांनी लगावला. कोविड सेंटरमध्ये मोठा घोटाळा असल्याने त्याबाबतची याचिका न्यायालयात दाखल केली असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी सांगितली.