VIDEO : घाणेरडं राजकारण फक्त शरद पवार करु शकतात, नवाब मलिकांची तेवढी कुवत नाही : Kirit Somaiya
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि आईच्याही नावे बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सोमय्यांच्या या दाव्यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांची पत्नी, मुलगा आणि आईच्याही नावे बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोमय्यांनी हा दावा केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सोमय्यांच्या या दाव्यावर अजित पवार काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मोहन पाटील, विजया पाटील, नीता पाटील आणि सुनेत्रा पवार एका कंपनीत पार्टनर आहेत. अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डरांचे पैसे आले आहेत.
