Kirit Somaiya Karad PC | मुश्रीफांवर घोटाळ्याचे आरोप, पवारांना सवाल, सोमय्यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Kirit Somaiya Karad PC | मुश्रीफांवर घोटाळ्याचे आरोप, पवारांना सवाल, सोमय्यांची संपूर्ण पत्रकार परिषद

| Edited By: | Updated on: Sep 20, 2021 | 11:58 AM

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कराडमध्ये पोलिसांनी रेल्वेतून उतरवलं. सोमय्यांनी तिथेच आज सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी ठाकरे सरकारवर कडाडून हल्ला चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. कराडमध्ये पोलिसांनी थांबवल्यानं किरीट सोमय्या चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. येत्या गुरुवारी पारनेर साखर कारखान्याला भेट देणार असून 27 तारखेला उद्धव ठाकरेंच्या 19 बंगल्यांचा घोटाळ्यांची पाहणी करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाहणी करण्यास जाणार असून अडवून दाखवा, असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे. किरीट सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आणखी एक आरोप केला आहे.