Kishori Pednekar | ‘त्या’ असंवेदनशील डॉक्टर-सिस्टरचं निलंबंन, वरळीच्या घटनेवर महापौरांचं स्पष्टीकरण

Kishori Pednekar | ‘त्या’ असंवेदनशील डॉक्टर-सिस्टरचं निलंबंन, वरळीच्या घटनेवर महापौरांचं स्पष्टीकरण

| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 12:34 PM

वरळीतील सिलेंडर स्फोटात आई, वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळाला वाचवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं म्हटलं. बाळावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. त्या बाळाचे पालक आम्ही आहोत. नुसत्या बोंब मारुन संवदेना दाखवता येत नाही. ज्या कंपनीचा तो सिलेंडर होता त्या कंपनीशी संपर्क केला. आमच्या कार्यकर्त्यांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन जखमींना बाहेर काढलं.  पोदारमध्ये नेलं, तिथून ती रुग्णवाहिका कस्तुरबाला न्यायचं होतं. रुग्णवाहिका नायरला नेण्यात आली. वरळीतील सिलेंडर स्फोटात आई, वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर आणि परिचारिका यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आई आणि मुलगी यांना कस्तुरबाला आणलं गेलं. त्यांना 56 टक्के भाजलं होतं. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण अपयश आलं, असं किशोरी पेडणेकर म्हणाले.