Kishori Pednekar | संजय राऊत लवकरच बाहेर येतील : किशोरी पेडणेकर

Kishori Pednekar | संजय राऊत लवकरच बाहेर येतील : किशोरी पेडणेकर

| Updated on: Aug 01, 2022 | 10:00 AM

शिवसेना पूर्णत: संजय राऊतांच्या पाठिशी आहे. आज ठिकठीकाणी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात सह्यांची मोहीम होणार आहे.

मुंबई – शासकिय यंत्रणांना त्यांचं काम करु दिलं पाहिजे. ऑडीओ क्लिपचा आणि ईडी कारवाईचा काही फारसा संबंध नाही. शासकिय यंत्रणांचा वापर दबावाला बळी न पडणा-यांवर केला जातोय. रामदास कदमांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ फडणवीसांबाबतचा आहे. किमान रामदास कदमांनी तरी संजय राऊतांबाबत बोलु नये. कदमांचं सर्टीफिकेट गरजेचं नाही. छगन भुजबळांनाही छळलं गेलं ते क्लिन चिट घेऊन बाहेर आले आहेत. शिवसैनिक तर आक्रमक होणारच…मात्र, शासकिय यंत्रणा जो निर्णय घ्यायचा तो घेतील अनेकांना ईडी लागल्या, छापे पडले ते काय संजय राऊतांनी सांगितलं का? शिवसेना पूर्णत: संजय राऊतांच्या पाठिशी आहे. आज ठिकठीकाणी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात सह्यांची मोहीम होणार आहे.

Published on: Aug 01, 2022 10:00 AM