सलग 5 व्या दिवशी कोकण किनारपट्टीवर समुद्राचं तांडव

सलग 5 व्या दिवशी कोकण किनारपट्टीवर समुद्राचं तांडव

| Updated on: Jul 27, 2025 | 5:21 PM

कोकणातील समुद्र नेहमीच अप्रत्याशित असतो; कधी शांत तर कधी रौद्ररूप धारण करणारा आहे. सध्या कोकणातील समुद्राने आपले खवळलेले रूप दाखवले आहे.

कोकणातील समुद्र नेहमीच अप्रत्याशित असतो; कधी शांत तर कधी रौद्ररूप धारण करणारा आहे. सध्या कोकणातील समुद्राने आपले खवळलेले रूप दाखवले आहे. गेल्या पाच दिवसांपासून या भागात समुद्राला प्रचंड उधाण आले आहे, ज्यामुळे किनारपट्टीवर अजस्त्र लाटांचा तांडव सुरू आहे. रत्नागिरीच्या भगवती जेटीवरून समुद्राच्या लाटा किनाऱ्यापलीकडे उसळत आहेत. रत्नागिरी, राजापूर, दापोली आणि गुहागरच्या किनारपट्टीवर समुद्राचे हे रुद्ररूप स्पष्ट दिसत आहे. सध्या या भागात ५.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा किनाऱ्यावर येत असून, हा प्रकार धोकादायक ठरत आहे.

सोसाट्याचा वारा आणि प्रचंड लाटांमुळे किनारी भागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे किनारपट्टीवरील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या कोकणात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी गेल्या पाच दिवसांपासून समुद्रातून उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत, जे पाहून धडकी भरते.

Published on: Jul 27, 2025 05:21 PM