Video | 40 वर्षानंतर ‘कोयना’चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
कोयना धरण परिसरात यंदा धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल 40 वर्षांनंतर कोयना बॅकवॉटरचं पाणी मोठ्या प्रमाणात आटल्यानं 1952 सालचं जुनं बामणोली गाव पुन्हा दिसू लागलं आहे.
कोयना धरण परिसरात यंदा धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. तब्बल 40 वर्षांनंतर कोयना बॅकवॉटरचं पाणी मोठ्या प्रमाणात आटल्यानं 1952 सालचं जुनं बामणोली गाव पुन्हा दिसू लागलं आहे.
कोयना धरण उभारणीपूर्वी बामणोली गाव अस्तित्वात होतं. मात्र धरण प्रकल्पानंतर हे गाव पाण्याखाली गेलं. आता पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्यानं जुन्या घरांचे अवशेष, दगडी रस्ते आणि काही बांधकामांचे भाग स्पष्ट दिसत आहेत.
दरम्यान, कोयना धरणातील जलसाठा आणि बदलतं हवामान यावरही चर्चा सुरू झाली आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
स्थानिकांच्या मते, इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी कमी झाल्याचं दृश्य अनेक दशकांनंतर प्रथमच पाहायला मिळत आहे. कोयना बॅकवॉटर आटल्यानं पाण्याखाली गेलेल्या जुन्या बामणोली गावाचे अवशेष पुन्हा समोर आले आहेत. मात्र ही बाब चिंताजनक मानली जात असून पाण्याची घटलेली पातळी, वाढतं तापमान आणि संभाव्य पाणीटंचाईबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
