लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…

| Updated on: Aug 26, 2026 | 2:40 PM

नाशिकच्या लासलगावहून दिल्लीसाठी सुटणाऱ्या कांदा एक्स्प्रेसला अठ्ठावीस तासांचा विलंब झाला असून, कांद्याचे प्रमाणही घटले आहे. दुसरीकडे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या द नाईन्स हॉटेलवरून सुषमा अंधारे आणि संगीता तिवारी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ६० कोटींच्या गुंतवणुकीवरून आणि हॉटेलच्या स्वरूपावरून राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे.

नाशिकच्या लासलगावहून दिल्लीला रवाना होणाऱ्या कांदा एक्स्प्रेसबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आज दुपारी दोन वाजता ही एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. मात्र, ही रेल्वे तब्बल अठ्ठावीस तासांच्या विलंबाने सुटत आहे. या मालगाडीमध्ये कांदा लोडिंगला उशीर झाल्यामुळे हा विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला ८४० टन कांदा दिल्लीला पाठवण्याचे नियोजन होते, परंतु आता प्रत्यक्षात ५०० टन कांदाच दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

कांद्याच्या पॅकिंगमध्ये झालेल्या अडचणींमुळे लोडिंग प्रक्रियेला विलंब झाला, अशी माहिती उपलब्ध आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक्स्प्रेस महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे विलंब आणि घटलेल्या लोडिंग क्षमतेमुळे काही प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे.

Published on: Aug 26, 2026 2:40 PM
Follow Us