Nashik Crime : बायकोचं प्रेम प्रकरण आलं नवऱ्याच्या अंगलट, 4-5 जणं आले अन् असं कोंबलं की… बघा व्हिडीओ

Nashik Crime : बायकोचं प्रेम प्रकरण आलं नवऱ्याच्या अंगलट, 4-5 जणं आले अन् असं कोंबलं की… बघा व्हिडीओ

| Updated on: Sep 19, 2025 | 10:54 AM

नाशिकच्या सातपूर परिसरात एका तरुणाचे दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला. तेजस धाडगे नावाच्या या तरुणाचे चार ते पाच जणांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो पळून पोलीस स्टेशन पोहोचला.

नाशिकच्या सातपूर परिसरात बुधवारी दुपारी एका तरुणाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. तेजस धाडगे नावाच्या या तरुणाला चार ते पाच जणांनी चारचाकी गाडीत जबरदस्तीने चढवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्याचा मोबाईलही हिसकावून घेतला. मात्र तेजस वेळीच पळून गेला आणि पपया नरसरी पोलीस चौकीत पोहोचला. पोलिसांनी गिरीश शिंगोटे यासह काही अज्ञात व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की, ही घटना तेजसच्या पत्नीच्या पूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे घडली असावी. मुख्य आरोपी गिरीश आणि तेजसची पत्नी यांच्यात लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Sep 19, 2025 10:54 AM