VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 AM | 31 October 2021
तुम्ही लवंगी फटाका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे, असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरीट सोमय्या यांनी हा इशारा दिला
तुम्ही लवंगी फटाका फोडला. तोही फुस्स निघाला. पण मी दिवाळीपासून देव दिवाळीपर्यंत फटाक्यांवर फटाके फोडणार आहे. जवळपास अर्धा डझन फटाके फोडणार आहे, असा सूचक इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना किरीट सोमय्या यांनी हा इशारा दिला. एक नाय… दोन नाय… तीन नाय… चार नाय… पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फुटणार आहेत. दिवाळी ते देव दिवाळीपर्यंत हे फटाके फुटणार आहेत. या ठाकरे सरकारने घोटाळे केले. तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आहेत. अजित पवारांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या जावयांना खूश केलं. नवाब मलिकांनी त्यांच्या जावयांना खूश केले. पण मी या सर्वांचे फटाके फोडले, असं सोमय्या म्हणाले.
