Aurangabad Flood | मानवी साखळी करून विद्यार्थ्यांची सुटका, औरंगाबादेत रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

| Updated on: Sep 24, 2021 | 9:08 AM

विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावात जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतणे अवघड झाले होते.

Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सुटका केली. पुराच्या पाण्यात मानवी साखळी बनवून विद्यार्थ्यांची सुटका केली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पळशी गावात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर गावात जोरदार पाऊस झाला होता. पावसामुळे अंधारी परिसरातील नाल्याला तुफान पूर आला. पूर ओसरत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून घरी परतणे अवघड झाले होते. मात्र गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीला धाव घेतली. पुराच्या पाण्यात मानवी साखळी करत गावकऱ्यांनी चिमुरड्या विद्यार्थ्यांची सुटका केली. गावकऱ्यांनीच अंगाचा थरकाप उडवणारं रेस्क्यू ऑपरेशन राबवल्याने कौतुक होत आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.