Maharashtra Board SSC 10th Result 2025 Declared : गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार

Maharashtra Board SSC 10th Result 2025 Declared : गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार

| Updated on: May 13, 2025 | 1:01 PM

SSC 10th Result 2025 LIVE : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली.

कॉपी मुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी पोलिसांनी मदत केली. तरी ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाला त्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. तपास करून हा निर्णय घेतला जाईल, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे. आज राज्याचा 10वीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

पुढे शरद गोसावी यांनी सांगितले की, इयत्ता दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत झाल्या. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख लेखी परिक्षे दरम्यान एक दिवसाचा खंड ठेवण्यात आला आहोता. निकाल लवकर जाहीर होऊन ११ वीचे वर्ग सुरू व्हावे. तसेच पुरवणी परीक्षेचा निकालही लवकर लागावा यासाठी प्रयत्न होता. प्रत्येक पेपरसाठी नियमित वेळेनंतर १० मिनिटे वाढवून दिली होती. परीक्षेत गैरप्रकार घडला तर कोणती शिक्षा होऊ शकते हे विद्यार्थ्यांना हॉलमध्ये सांगितलं होतं. कोणती शिक्षा होऊ शकते याची कल्पना असावी म्हणून सांगण्यात आलं होतं, असंही गोसावी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना 1 वाजेपासून निकाल ऑनलाइन बघता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org, sscresult.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांसह विद्यार्थ्यांना आपला दहावीचा निकाल tv9marathi.com वर देखील बघता येणार आहे. आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा, रिझल्ट लागला की लगेच मेसेज किंवा ईमेलवर तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळणार. नोंदणीसाठी एक बॉक्स दिलाय. रोल नंबर, नाव, ईमेल आयडी, फोन नंबर या गोष्टी तुम्हाला नोंदणीसाठी लागतील.

Published on: May 13, 2025 12:00 PM