Devendra Fadnavis | फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला

| Updated on: Mar 14, 2026 | 3:45 PM

गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक घरगुती सिलेंडरसाठी रांगेत उभे राहतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करून रांगा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक घरगुती सिलेंडरसाठी रांगेत उभे राहतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती निर्माण करून रांगा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकार, गॅस कंपन्या आणि सचिवांनी स्पष्ट केले आहे की घरगुती गॅसच्या पुरवठ्याचा कुठेही तुटवडा नाही. जेवढे सिलेंडर महिन्याला लोकांना लागतात, तेवढा पुरवठा पुरवला जातोय. त्यामुळे नागरिकांना विनाकारण चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि रांगा लावण्याचे कारणही नाही. ऑनलाईन बुकिंगसुद्धा सुरू असल्याने लोकांना वेळेत गॅस मिळत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले की, “देशात पॅनिक वातावरण तयार करण्याची ही काँग्रेसची बुद्धी आहे, आणि ही बुद्धी देशासाठी विघातक ठरते.” त्यांनी नागरिकांना विनाकारण घाबरू नये आणि अधिकृत माध्यमातून गॅस पुरवठ्याची माहिती घेण्याचे आवाहन केले. या वक्तव्याद्वारे सरकारने गॅस तुटवड्यावरील जनतेच्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

Published on: Mar 14, 2026 03:45 PM
Follow Us