Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट…

Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट…

| Updated on: Oct 02, 2026 | 3:11 PM

धाराशिव जिल्ह्यातील दयानंद राठोड या अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत कुटुंबाला आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांची कळकळीची विनंती आहे.

धाराशिव जिल्ह्यातील खानापूर येथील अल्पभूधारक शेतकरी दयानंद राठोड (वय ३५) यांनी नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आपल्या पिकांची दुरवस्था पाहून भविष्यात कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत त्यांनी गळफास घेतल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. दयानंद राठोड हे ऊसतोड कामगार म्हणूनही काम करत होते.

नापिकीमुळे आलेले आर्थिक संकट, बँकेकडून कर्ज न मिळणे आणि लोकांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करावी या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

आज दयानंद राठोड यांच्या मृतदेहासह त्यांच्या नातेवाईकांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शासनाने दयानंद यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. केवळ आश्वासने न देता ठोस उपाययोजना करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली असून, न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

Published on: Oct 02, 2026 3:11 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us