Dilip Kumar Death | राजभवनकडून दिलीप कुमार यांचा आठवणींना उजाळा,  माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लता मंगेशकर यांच्यासोबतचा फोटो ट्विट

Dilip Kumar Death | राजभवनकडून दिलीप कुमार यांचा आठवणींना उजाळा, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, लता मंगेशकर यांच्यासोबतचा फोटो ट्विट

| Edited By: | Updated on: Jul 07, 2021 | 3:56 PM

महाराष्ट्राच्या राजभवन कार्यालयानं दिलीप कुमार यांचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिलीप कुमार यांच्यासह त्यावेळच्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे या फोटोत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी देखील दिसत आहेत. 

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ते आजारी होते. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिलीप कुमार आज जरी आपल्यात नसतील तरी त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून, गीतांच्या माध्यमातून ते नेहमी अजरामर राहतील. महाराष्ट्राच्या राजभवन कार्यालयानं दिलीप कुमार यांचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. यामध्ये दिलीप कुमार यांच्यासह त्यावेळच्या चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे या फोटोत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी देखील दिसत आहेत.