Ajit Pawar : अवघडच आहे… दादांचाच नॉनव्हेज बॅनला विरोध, ‘या’ 5 महापालिकांकडून 15 ऑगस्टला चिकन, मटण बंदीचं फर्मान
15 ऑगस्टला मटण आणि चिकन विक्रीवर आतापर्यंत पाच महापालिकांनी बंदी घातली आहे. 1988 च्या कायद्याचा दाखला देत या महापालिकांकडून पत्रक काढण्यात आले आहे. या निर्णयाला विरोधकांसह खाटिक संघटनांनी देखील विरोध दर्शवला आहे. तर स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मांस विक्री बंदीला विरोध केला आहे.
15 ऑगस्टला मटण, चिकन विक्री आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलाय. कल्याण डोंबिवली पासून मुख्यमंत्र्यांच्या नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच आतापर्यंत पाच महापालिकांमध्ये स्वातंत्र्यदिनी चिकन मटण मिळणार नाही. कल्याण डोंबिवली, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूरमध्ये चिकन मटण विक्रीला बंदी घातली असून कत्तलखाने ही बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहेत. अर्थात महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत पण 24 महापालिकांनी अद्याप मटण विक्रीच्या बंदीचा निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच महापालिकांच्या निर्णयाचा विरोध केला आहे. तर मांस विक्रीच्या निर्णयाला सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेनेच केली पण असे आदेश दरवर्षीच निघतात असं महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचं म्हणणं आहे. दरम्यान, कल्याण डोंबिवलीमध्ये हिंदू खाटिक संघटना आक्रमक झाली आहे मांस बंदीच्या निर्णयाचा खाटिक संघटनेन विरोध केला आहे. महापालिकेच्या गेटवरच दुकान लावण्याचा इशारा खाटिक संघटनेने दिला आहे.
