
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याचे चर्चा. काँग्रेसनं आरोप फेटाळले. तर हा मानसिक नक्षलवाद नाहीतर काय, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. नारीशक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण […]
काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याचे चर्चा. काँग्रेसनं आरोप फेटाळले. तर हा मानसिक नक्षलवाद नाहीतर काय, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका. पंतप्रधान मोदींच्या खिशात आयर्लंडचा झेंडा होता का? आदित्य ठाकरेंची टीका. मोदींनी जॅकेटवर तिरंगा उलटा लावल्याचा आरोप. नारीशक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरून मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याचीही खंत व्यक्त. नारीशक्ती विधेयक 2023 लाच मंजूर झालाय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप नाही, विरोधकांचा निशाणा. तर डीलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य. विरोधक येडा बनून पेढा खातायेत, मुख्यमंत्र्यांची टीका. धनंजय मुंडें सोबतचा संघर्ष मिटला. बहिण भावातला, कुटुंबातला आणि दोन पक्षातला वादही मिटला. बीडच्या कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. धनंजय मुंडेंकडून टाळ्या वाजवत दाद. चाकणमधील वाहतूक कोंडी आणि उद्योजकांच्या समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन. राज्य सरकारचा मोठा निर्णय. उद्योजकांच्या अपेक्षा कमीत कमी वेळेत पूर्ण केल्या जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन.
तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी चाकणमध्ये द्या. आदित्य ठाकरेंची मागणी. रस्ते पाहणीनंतर आदित्य ठाकरेंचा चाकणमधील उद्योजकांशी संवाद. शिंदेंचे आमदार शरद सोनवणे यांची पत्रकाराला धमकी. 15 ऑगस्ट होऊ दे, तुझ्याकडे पाहतो. माझ्यावर पहिल्यापासून खूप कलम, भरसभेत शरद सोनवणे यांची अरेरावी. कैलास पाटील ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग. तुळजापूरमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवणार. प्रताप सरनाईक यांचा मिश्किल टोला. तर गंभीर प्रश्नांवरून लक्ष वळवण्यासाठी टिंगलटवाळी, कैलास पाटील यांची टीका. मनोज जरांगेंच्या उपस्थितीत आरक्षण अभ्यासकांची आज बैठक. अंतरवालीत जरांगे अभ्यासकांशी चर्चा करणार. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीला महत्त्व. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही. 18 तारखेपासून कारवाई करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. तर कल्याण-डोंबिवली, नालासोपाऱ्यातील रिक्षाचालकांकडून मुदतवाढीची मागणी. ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदराचा वावर. कल्याणमधल्या गोदरेज हिल स्टोअरचा व्हिडीओ व्हायरल. ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या सुरक्षेतेवरच प्रश्नचिन्ह. एफडीआयच्या कारवाईकडे लक्ष. तमिळनाडू स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात त्रिशा कृष्णन पहिल्या रांगेत. मुख्यमंत्री विजय यांच्या आई-वडिलांजवळ त्रिशाचे आसनव्यवस्था. परेडदरम्यान थलपतींना त्रिशाचा सॅल्यूट. सोशल मीडियावर जोरदार चर्चा. स्वातंत्र्यदिनानिमित्त अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा. सीमा दलाच्या जवानांकडून शिस्तबद्ध संचलन. बॉर्डरवर महाराष्ट्राच्या पारंपरिक मल्लखांब खेळासह लेझीमचा नाद दुमदुमला.
Published on: Aug 16, 2026 8:38 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तृणमूल काँग्रेसच्या नेत्याचा संशायास्पद मृत्यू, कार्यालयातच घडली घटना
वंदे मातरम् पूर्ण न म्हटल्याने प्रणिती शिंदे वादात, नव्या मोठ्या..
पेट्रोलवरील ‘स्पेशल टॅक्स’ शून्य होताच दर घसरले? आजचा नवीन रेट काय?
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
50 लाख आणि महिलांच्या अधिकारासंदर्भातला सोपा प्रश्न, माहितीये उत्तर?