Sandeep Deshpande | धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम; दंड थोपाटले

| Updated on: Apr 24, 2026 | 11:16 AM

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, चालकांना ग्राहकांशी मराठीत संवाद साधणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. या निर्णयाला विरोध करत काही संघटनांनी 4 मेपासून सुमारे 15 लाख रिक्षाचालक संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, चालकांना ग्राहकांशी मराठीत संवाद साधणं बंधनकारक करण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही दिला आहे. या निर्णयाला विरोध करत काही संघटनांनी 4 मेपासून सुमारे 15 लाख रिक्षाचालक संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. शिवसेनेतील नेते संजय निरुपम यांनीही या सक्तीला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाच्या समर्थनार्थ आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा देत, “मुंबई बंद करण्याच्या धमक्या देणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे,” असं म्हटलं आहे. त्यांनी स्थानिक भाषा न येणाऱ्या चालकांना परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली. “राज्यात काम करायचं असेल तर मराठी भाषा पूर्णपणे येणं गरजेचं आहे,” असं स्पष्ट करत त्यांनी बाहेरील चालकांवरही टीका केली. या सर्व घडामोडींमुळे मराठी भाषा सक्तीचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, येत्या काही दिवसांत संघर्ष वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

 

 

Published on: Apr 24, 2026 11:16 AM
Follow Us