Uddhav Thackeray : कर्ज काढून दिवाळी! राज्यावरील 9 लाख कोटींच्या कर्जावरून हंगामा, ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray : कर्ज काढून दिवाळी! राज्यावरील 9 लाख कोटींच्या कर्जावरून हंगामा, ठाकरेंचा हल्लाबोल

| Updated on: Sep 16, 2025 | 5:55 PM

महाराष्ट्रावरील जवळपास नऊ लाख कोटींच्या कर्जाबाबत राजकीय वादंग निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा आरोप केला आहे तर सरकारने विकासकामांसाठी कर्ज आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. या कर्जाच्या आकड्यावर आणि त्याच्या परिणामांवर विविध मतं व्यक्त होत आहेत.

महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त होत आहे. राज्यावर जवळपास नऊ लाख कोटींचे कर्ज असल्याचे वृत्त आहे. या कर्जबाबत विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कठोर टीका केली आहे. त्यांनी सरकारवर कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, सरकारने हे कर्ज विकासकामांसाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. जून २०२४ अखेरीस कर्जाचा आकडा ८ लाख ५५ हजार ३९७ कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २४ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले गेले. वर्षाच्या अखेरीस हा आकडा ९ लाख ३२ हजार २४२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सरकारच्या या आर्थिक धोरणावरून सध्या राज्यात चर्चा रंगली आहे.

Published on: Sep 16, 2025 05:55 PM