देहूगाव नगरपंचायतीसाठी मतदान, सुनील शेळके बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला

देहूगाव नगरपंचायतीसाठी मतदान, सुनील शेळके बाळा भेगडे यांची प्रतिष्ठा पणाला

| Edited By: | Updated on: Jan 18, 2022 | 10:10 AM

देहुगाव नगरपंचायती साठी आज चार जागांसाठी मतदान होत आहे. या चार जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.  मतदान सुरू होण्याआधी उमेदवारांनी मतदान ईव्हीएम मशीनची पूजा करत मतदानाला सुरुवात केली.

देहुगाव नगरपंचायती साठी आज चार जागांसाठी मतदान होत आहे. या चार जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत.  मतदान सुरू होण्याआधी उमेदवारांनी मतदान ईव्हीएम मशीनची पूजा करत मतदानाला सुरुवात केली. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या गटासाठी झालेल्या या चार जागांसाठी मतदान होत आहे. देहू नगरपंचायतीतील 13 प्रभागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले आहे. उर्वरित चार प्रभागांसाठी आज मतदान होतंय.  या निवडणुकीत भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.