Raj Thackeray : राज ठाकरेंच्या डोक्यात चाललंय तरी काय? युतीबाबत सध्या वेट अँड वॉच अन्…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या पदादिकाऱ्यांना उद्धव ठाकरे सोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलणार असं म्हटलंय त्यासोबतच मनसे मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत असणार असा विश्वासही राज ठाकरे यांनी व्यक्त केला पण असं असलं तरीसुद्धा गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी इतर छोट्या पक्षांकडे सुद्धा लक्ष देण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच्या युतीवर कार्यकर्त्यांना वेट अँड वॉचचा सल्ला दिला. राज ठाकरे यांनी मुंबईच्या पदादिकाऱ्यांचा मेळावा घेतला ज्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे 100 टक्के सत्तेत येणार.. महाराष्ट्राच्या राजकारणात यापुढे काय काय घडणार याची तुम्हाला कल्पनाही नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने सोबतच्या युतीवर योग्य वेळी बोलेल. युतीचं काय करायचं ते माझ्यावर सोडा 20 वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही एकाच पक्षात का भांडता? स्थानिक मुद्द्यांसाठी ग्राउंडवर उतरून कोणालाही न घाबरता काम करा. मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवताना हिंदी भाषिकांचा द्वेष करून नका. योग्य वेळी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचा निर्णय घेणार, असं राज ठाकरे म्हणाले. यावरून असं दिसतंय की, युतीबाबतची घोषणा आणि निर्णय घेण्याच्या मूडमध्ये राज ठाकरे सध्या तरी नाहीत.. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याच्या शक्यता आहे. मात्र राज ठाकरेंकडून वारंवार मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आशावादी असल्याचे पाहायला मिळतंय
